LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्बाचा संशय; डॉग स्क्वॉड आणि बीडीएस पथक दाखल

पुणे :- माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पिंपरी चिंचवडमधील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली होती. महाविद्यालायत ईमेलद्वारे आकुर्डी येथील डॉ डी वाय पाटील महाविद्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सर्वांची धांदल उडाली, एकचं खळबळ उडाली. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने महाविद्यालय परिसर गजबजेला असून विद्यार्थ्यांची देखील 100 टक्के उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे, या ई-मेलची तत्काळ दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांसह बॉम्बस्कॉडनेही डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये सर्वत्र तपासणी केली. यावेळी, त्यांच्यासमवेत डॉगस्कॉडही पाहायला मिळाले. दरम्यान, कुणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणा केल्याचं लक्षात आल्यानंतर शिक्षकांसह विद्यार्थ्यांचा देखील जीव भांड्यात पडला.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बॉम्ब संदर्भातील ईमेलनंतर विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रच गोंधळ झाल्याचंही दिसून आलं. सकाळी साडे अकराच्या सुमारास हा ई-मेल येताच पोलिसांच्या कंट्रोल रुमला महाविद्यालय प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यानंतर, बिडीडीएसचं पथक तातडीनं महाविद्यालयात पोहचलं, गेल्या तीन तासांपासून बॉम्बस्कॉड पथकाडून तपासणी व शोधमोहिम सुरू होती. या शोधकार्यात संपूर्ण महाविद्यालय परिसरात कुठेही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे अज्ञाताने हा खोडसाळपणा केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांच्या शोधमोहिमेनंतर खोडसाळपणाचे स्पष्ट होताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्या या अज्ञाताचा शोध सुरु आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील अनेकदा अशा काही संस्थांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या अफवा पसरवल्या गेल्याचं पाहायला मिळालं आहे. शासकीय कार्यालये किंवा, शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल किंवा फोन करुन अफवा पसरवण्याचा प्रकार घडला आहे. मात्र, पोलिसांनी व बॉम्बस्कॉड पथकाने या घटना उघड्या पाडल्या आहेत. तसेच, संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई देखील करण्यात आलीय. आता, पिंपरीतील या कॉलेजमध्येही असाच खोडसाळपणा करण्यात आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

This will close in 21 seconds