LIVE STREAM

Crime NewsInternational NewsLatest News

धक्कादायक! बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात ट्रेन हायजॅक केली; ४५० जण ओलीस

इस्लामाबाद :- पाकिस्तानात दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोलान स्टेशनवर बलुच लिबरेशन आर्मी च्या अतिरेक्यांनी बंदुकीच्या जोरावर ट्रेन हायजॅक केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये ४५० प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची जबाबदारी घेत बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सुरक्षा दलाचे सहा सैनिक मारल्याचाही दावा केला आहे.

या हायजॅक केलेल्या ट्रेनमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलीस, दहशतवाद विरोधी दल आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे कर्तव्यावर असलेले कर्मचारी असल्याची माहिती आहे. हे सगळे सुट्टीसाठी पंजाबला जात होते. त्यादरम्यान ही ट्रेन हायजॅक करण्यात आली. जर कुठली कारवाई केली तर ओलीस असलेल्या सर्व नागरिकांना मारुन टाकण्याची धमकीही बीएलएने दिली आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानात एकच दहशत पसरली आहे.

ही बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) काय आहे, या संस्थेचा इतिहास काय आहे, याचे नेतृत्व कोण करत आहे, बीएलएच्या सैनिकांची विचारधारा काय आहे आणि ही संघटना पाकिस्तान आणि चीनला कशा प्रकारे लक्ष्य करत आहे, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर आता समोर येत आहेत.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) स्थापना आणि उद्देश?

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना २००० मध्ये करण्यात आली होती.

स्थापनेपासूनच बीएलएने पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत.

बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळा स्वायत्त प्रदेश किंवा देश बनवण्यासाठी बीएलएची स्थापना करण्यात आली होती.

बीएलएमध्ये ६००० बलुच बंडखोर सहभागी आहेत.

स्वायत्त बलुचिस्तानबाबत पाकिस्तानमध्ये जवळपास सात दशकांपासून संघर्ष सुरू आहे. या काळात या प्रदेशात अनेक बलुच संघटना उदयास आल्या.

यापैकी BLA सर्वात मजबूत आणि अधिक काळ अस्तित्वात असलेली संस्था आहे.

BLA मध्ये अनेक बंडखोर सहभागी झाले आहेत, हे सर्व शस्त्र हाताळणी आणि पारंपारिक युद्धात तज्ञ आहेत.

या संघटनेला बुगटी, मेंगल आणि मारी समुदाय तसेच बलुचिस्तानमध्ये राहणारे इतर समुदायांचाही पाठिंबा आहे.

बीएलएच्या बंडखोरांना मॉस्कोमध्ये प्रशिक्षण

पाकिस्तानपासून वेगळे बलुचिस्तानची चळवळ ही सोव्हिएत युनियन आणि कट्टर मार्क्सवादी विचारसरणीपासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या अनेक बंडखोरांना मॉस्कोमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठी या विचारसरणीने प्रेरित असल्याचं सांगितलं जातं.

बीएलएचे नेतृत्व कोण करत आहे?

बलुचिस्तानमध्ये बीएलएच्या कारवायांना मोठं समर्थन मिळालं आहे. मात्र, येथील लोक उघडपणे बलुच लिबरेशन आर्मीला पाठिंबा देताना दिसत नाहीत. जेव्हा बीएलए उदयास येऊ लागली तेव्हा त्यांच्याशी चर्चा करुन समस्येचं निवारण करण्याऐवजी २००६ मध्ये पाकिस्तान सरकारने या संघटनेवर बंदी घातली. तेव्हापासून बीएलए पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. बलुच लिबरेशन आर्मीची रचनुसार अनेक स्तरावर वेगवेगळ्या प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही संघटना सर्वाधिक काळ चालवणाऱ्यांमध्ये अस्लम बलुचचं नाव आघाडीवर आहे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!