नागपूर पोलिसांचा ई-सिगारेटवर छापा! ₹२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर :- नागपूर शहरात अवैध ई-सिगारेट विक्रीचा पर्दाफाश! गुन्हे शाखेच्या पथकाने टेकसास स्मोक शॉपमध्ये टाकला छापा आणि ₹२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. भारतात ई-सिगारेट विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर या उत्पादनांची विक्री सुरू होती.
पाहुयात सविस्तर रिपोर्ट..
नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने हिंगणा रोडवरील टेकसास स्मोक शॉपमध्ये छापा टाकला आणि विविध ब्रँड्सच्या ई-सिगारेटसह २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दुकान मालक विजय खंडेलवाल याने हा साठा विदेशातून आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. भारतात ई-सिगारेटवर बंदी असतानाही या ठिकाणी खुलेआम विक्री सुरू होती. पोलिसांनी नेस्टी, राया D2, इलेबार कंपनीचे फ्लेवर्ड ई-सिगारेट जप्त केले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध ई-सिगारेट विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. हा प्रकार कायद्याचे उल्लंघन असल्याने यावर कडक कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक माहितीसाठी राहा सिटी न्यूजसोबत!