माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री राजिंद्र हरभजनसिंग कौर यांचे दुःखद निधन

एक अत्यंत दुःखद बातमी… माजी खासदार नवनीत राणा यांच्या मातोश्री आणि आमदार रवी राणा यांच्या सासू राजिंद्र हरभजनसिंग कौर यांचे मुंबईत दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू होते, मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे संपूर्ण राणा कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन उद्या सकाळी गोरेगाव येथील निवासस्थानी होणार असून, अंत्यसंस्कार ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.
राजिंद्र हरभजनसिंग कौर यांचे वयाच्या 61 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुप्रसिद्ध लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. माजी खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण वेळ आईची सेवा केली, मात्र आज त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राणा कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले असून, या दुर्दैवी घटनेमुळे आमदार रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मेळघाटमध्ये होणारा होळी उत्सव रद्द केला आहे. दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत साजरा होणारा हा सण यंदा रद्द करण्यात आला आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली वाहिली जात आहे. अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील समर्थकांनी त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला आहे.