मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू! भरधाव ट्रॅक्टरची ट्रॉली पलटून दुर्दैवी घटना

अकोला :- अकोला शहरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे! मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा भरधाव ट्रॅक्टरमुळे दुर्दैवी मृत्यू झालाय. प्रतिभा किरडे असं मृत महिलेचं नाव असून, अकोली जहागीर परिसरात ही दुर्घटना घडली आहे. अपघात कसा घडला, नेमकं काय झालं? पाहुया हा सविस्तर रिपोर्ट!
आज सकाळी अकोला शहरात एक दुर्दैवी घटना घडली. प्रतिभा किरडे या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र, तूर घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अनियंत्रित होऊन अचानक पलटली आणि त्या ट्रॉलीखाली दबल्या गेल्या. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अकोला शहरातील हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील वाढत्या रस्ते अपघातांबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या घटनेत दोषी असलेल्या ट्रॅक्टर चालकावर कडक कारवाई होणार का? पुढील तपास काय सांगतो? यासाठी ‘सिटी न्यूज’वर अपडेट्स पाहत राहा.