अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये नवे तेल साठे सापडल्याने भारताच्या तेल उत्पादनात वाढीची आशा

अरबी समुद्रात सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेत नवे खनिज तेल साठे सापडल्याने भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते.
भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता
केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात 5338 आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात 13 हजार 131 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठयामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे. कोकणातील डहाणू आणि मालवण या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू होईल, जे स्थानिक उद्योगांना चालना देईल आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे. अन आशा आहे की, हे नवे तेल साठे भारताला तेल उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील.
2017 मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे
सिंधुदुर्गातील मालवणजवळ पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील समुद्रात आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. अरबी समुद्रात 8 वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. या नव्या साठ्याचे केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या उत्खनन करणार आहेत. या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. 2017 मध्ये सापडलेल्या साठ्याच्या तुलनेत हे तेल साठे मोठे असल्याने तेल उत्पादन 4 पटीने वाढणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. डहाणूच्या समुद्रात 5338.03 आणि व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 13 हजार 131.72 चौरस किमी क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. या तेल साठ्यामुळं भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर तेलाचं उत्पादव वाढणार आहे.