उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली साईनगर येथील गोकुळ कॉलनी व नवीबस्ती बडनेरा परिसराची पाहणी
अमरावती :- आज दि.१२/०३/२०२५ रोजी प्रभाग क्रमांक १९ साईनगर येथील गोकुळ कॉलनी व प्रभाग क्रमांक २२ नवी बस्ती झोन क्रमांक ४ बडनेरा येथे उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी परिसरातील साफ सफाई च्या कामाची पाहणी केली. यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी सफाई कर्मचा-यांची हजेरी रजिस्टरची तपासणी केली. यावेळी नियोजनबध्द पद्धतीने सदर परिसरातील साफ सफाई करा अशी सूचना उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली. स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार व घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत स्वच्छता करतांना रस्त्याचे साईड पट्टी स्वच्छता करण्यात यावी अशी सक्त सूचना त्यांनी केली. कचरा परिसर स्वच्छ करुन त्वरित तो कचरा घंटागाडीत टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छतेप्रमाणेच प्रत्येक विक्रेत्यांकडे कच-यासाठी डबा असलाच पाहिजे, असे निर्देश देऊन मार्केट जवळील कंपोस्ट पिट्स व्यवस्थितरित्या कार्यान्वित राहतील याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिश्ववी असताच कामा नयेत, असा कडक इशारा उपायुक्त महोदयांनी दिल्या.
हयगय नकोच, अन्यथा कारवाई साफ सफाईच्या कामात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशी तंबी देत संपुर्ण परिसर, नाले १०० टक्के साफ झाले पाहिजेत, रोड साईडला गवत दिसायला नको, दुभाजक स्वच्छ असावेत. अशा हातगाडयांवर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिल्या.
यावेळी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी बडनेरा झोन कार्यालयाची पाहणी केली. सदर झोन मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सदर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती जाणून घेतली.या पाहणी दरम्यान स्वास्थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, सफाई कामगार उपस्थित होते.