एमआयडीसी असोसिएशन आणि विद्यापीठ रिसर्च आणि इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

अमरावती :- एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन, अमरावती आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ रिसर्च आणि इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात उद्योग विकास, संशोधन आणि उद्योजकतेच्या वाढीसाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या कराराच्या माध्यमातून उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्य वाढवणे, विद्यार्थ्यांना उद्योग व संशोधन क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, तसेच स्टार्टअप आणि उद्योजकता, संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देणे, संयुक्त कार्यशाळा, सेमिनार आणि औद्योगिक उपक्रम आयोजित करणे, उद्योगांना नव्या तंत्रज्ञानाशी जोडणे आणि संशोधन सुविधांचा लाभ देणे, स्टार्टअप्ससाठी औद्योगिक मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करुन देणे, हा कराराचा मुख्य उद्देश आहे.
कराराप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष श्री किरण पातुरकर, सचिव श्री आशिष सावजी, रिसर्च आणि इन्क्युबेशन फाऊंडेशनच्या संचालक डॉ. स्वाती शेरेकर, मुख्य कार्यक्रारी अधिकारी श्री आनंद यादव, व्यवस्थापक श्री अमोल हिरुळकर, तसेच श्रीमती मोनिका उमप आदी उपस्थित होते.
हा करार पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे. उद्योग-शिक्षण सामंजस्य सहकार्यामुळे अमरावतीमधील उद्योग आणि संशोधन क्षेत्राला गती मिळणार असून, विद्यार्थ्यांना नवीन संधी आणि स्टार्टअप्सना मार्गदर्शन मिळेल. तसेच औद्योगिक आणि उद्योजकीय विकासाला चालना मिळणार आहे.