नांदेड अर्धापूर तामसा माहुर रस्त्याच्या कामाची पुनः सुरुवात!

नांदेड :- अर्धापूर – तामसा – माहुर जाणाऱ्या काँक्रिट सी.सी. रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित झालेल्या बातमीची दखल घेत, माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले.
एका वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या या रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या होत्या. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले. अपघातांमध्ये काहींना आपला जीवही गमवावा लागला. ही गंभीर परिस्थिती पाहून सिटी न्यूज चॅनलने ही बाब प्रकाशझोतात आणली. बातमीच्या प्रभावामुळे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्वरीत पावले उचलली आणि दोषी ठेकेदारांना रस्ता दुरुस्त करण्याचे आदेश दिले.
तर, सिटी न्यूज चॅनलच्या बातमीमुळेच हा रस्ता पुन्हा तयार होत आहे. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी अशाच महत्त्वाच्या विषयांवर आम्ही पुढेही आवाज उठवत राहू.