नागपुरातील धक्कादायक घटना, क्षुल्लक वादात लहान भावाने मोठ्या भावाचा केला कायमचा गेम!

नागपुर :- नागपुरात कुटुंबीयांमध्ये वादाचा एक भीषण शेवट! क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाची हत्या… धक्कादायक घटना कळमना परिसरात घडली. काय आहे संपूर्ण प्रकरण?
पाहूया आमचा खास अहवाल…
नागपूरच्या कळमना परिसरातील गुलशन नगरात ११ मार्चच्या रात्री भयाण घटना घडली. रामबाई यादव यांच्या तीन मुलांपैकी मोठा भाऊ राजू यादव आणि लहान भाऊ विजय यादव यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शब्दाने सुरू झालेला हा वाद शिवीगाळीत आणि नंतर हाणामारीत बदलला.
वाद एवढा टोकाला पोहोचला की, संतापलेल्या विजय यादवने मोठ्या भावाला जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत राजू यादवला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृतकाची आई रामबाई यादव यांनी कळमना पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विजय यादववर गुन्हा दाखल केला आहे.
घरगुती भांडणाचा असा भयानक शेवट… क्षुल्लक कारणांवरून उग्र वाद टोकाला जाऊ शकतो, हेच या घटनेतून पुन्हा स्पष्ट होतं. हा संतापजनक प्रकार कायद्याच्या चौकटीत कितपत गंभीर मानला जातो? या प्रकरणात आरोपीवर पुढे काय कारवाई होणार? यावर आमची नजर असेल…