मनपात यशवंतराव चव्हाण जयंती साजरी
अमरावती :- बुधवार दिनांक १२ मार्च,२०२५ रोजी यशवंतराव चव्हाण जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्य महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांचे हस्ते यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त दिपीका गायकवाड, सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे, सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, मधुकर घारड अध्यक्ष वनराई अमरावती विभाग, अमरावती तथा सदस्य वृक्ष प्राधिकरण, मनपा, अमरावती, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, राकेश पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.