लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला रंगेहात पकडले

यवतमाळ :- यवतमाळच्या दिग्रस पोलीस ठाण्यात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! एका पोलीस उपनिरीक्षकासह हवालदाराला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदतीसाठी पाच हजारांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर दोन हजार रुपये स्वीकारले गेले, आणि त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून पोलीस उपनिरीक्षक नारायण लोंढे आणि हवालदार दिलीप राठोड यांना रंगेहात अटक केली. पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
लाचखोरीवर आळा घालण्यासाठी प्रशासन सातत्याने कारवाई करत असले तरी काही भ्रष्ट अधिकारी अजूनही लाच घेताना रंगेहात सापडत आहेत. यावर कठोर कारवाई होईल का ? हा प्रश्न आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असून , या प्रकरणावर तुमचे काय मत ? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळव !