LIVE STREAM

AmravatiLatest News

विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांकडून मेळघाटातील आदिवासी बांधवांमध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाच्यावतीने मेळघाटातील चिखलदरा तसेच धारणी तालुक्यातील आदिवासी बांधवांसह युवक व युवतींकरीता असलेल्या शासनाच्या योजनांबाबत गडगा भांडुम, बहिराटकी, चिखली, सेमाडोह, मांगीया, रोरा, पोटीलावा, हरिसाल, लवादा, कढाव, भुलोरी, हातीदा या गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या भाषेमधून गोमा जावरकर, श्रीराम धांडे, मंगल सानू भिलावेकर, शामलाल भिलावेकर, राजू भिलावेकर या आदिवासी बांधवांकडून कीर्तनाच्या माध्यमातून मोठ¬ा प्रमाणावर शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी महिला व बालकांच्या पोषणाच्या समस्या, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेती, रोजगार, कुपोषण तसेच शासकीय आश्रमशाळा समुह योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी एकलव्य मॉडेल निवासी शाळा योजना, सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, भूमिहीन दारिद्र¬ रेषेखालील आदिवासींचे सबलीकरण, स्वाभिमान योजना, संस्थांना आश्रम शाळा चालविण्यास अर्थसाह्य, शासकीय आश्रम शाळेत कनिष्ठ महाविद्यालय सुरू करणे, इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे, आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, शालांत परीक्षा शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ¬क्रमात विद्याथ्र्यांना मिळणारा निर्वाह भत्ता योजना, सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना, आदिवासी मुलामुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, केंद्रवर्ती अर्थसंकल्प, मोटारवाहन चालक प्रशिक्षण केंद्र योजना, केंद्र शासन सहाय्य योजना, आदिवासी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या, सामाजिक कार्यकर्ता, संस्था, आदिवासी सेवकांना संस्था पुरस्कार, कन्यादान योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजना, पारधी विकास कार्यक्रमांतर्गत घरकुल योजना, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, वनसूचित क्षेत्रातील पंचायत विस्तार, वन हक्क कायदा आदींबाबत माहिती देण्यात आली. तसेच शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, कुपोषण आदींबाबत प्रा. आनंद कासदेकर यांनी कोरकू भाषेतील ऑडिओ क्लिप आदिवासी बांधवांना ऐकविली.

यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी समाजशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. बी. नायक, डॉ. के. यु राऊत, अंशदायी शिक्षक डॉ. रोहिणी देशमुख, संशोधक विद्यार्थी साधना इंगोले, रमेश पवार, सुनिता इंगळे, राजकुमार, एम. ए.भाग – 1 चे विद्यार्थी संदीप महाले, वैष्णवी गभणे, वैष्णवी बोंडे, विशाल आडे, यशोदा चिरांगे, एम.एभाग – 2 चे विद्यार्थी चंचल धंदर, गोपाल राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भूषण मोरे, धारणी येथील प्रतिष्ठित नागरिक राहुल उमाकांत देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!