AmravatiLatest News
विद्यापीठात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अमरावती :- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, एल.एल.ई. चे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, आस्थापना विभागाचे उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव श्री अनिल मेश्राम तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.