श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर नव्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा – १५ व १६ मार्चला भव्य आयोजन

अमरावती :- अमरावती-नागपूर महामार्गावरील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा १५ आणि १६ मार्च रोजी भव्य स्वरूपात पार पडणार आहे. गेल्या शंभर वर्षांपासून या मंदिराची देखभाल वीरशैव लिंगायत समाजाच्या श्री शंकर मंदिर संस्थान ट्रस्टमार्फत केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे जुन्या मंदिराची जागा शासनाने अधिक्रहित केल्याने नव्या ठिकाणी भव्य मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत या आयोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली .
अमरावती आणि परिसरातील शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटात साजरा होणार आहे. हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, विशेष पाहुणे म्हणून जगद्गुरु कर्नाटक अनेक शिवाचार्य आणि वेदविद्या पारंगत आचार्य यांची उपस्थिती लाभणार आहे. १५ मार्च रोजी वास्तूपूजन आणि रात्री भव्य शोभायात्रा, तर १६ मार्च रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर संस्थान ट्रस्टने केले आहे.