2025 सत्रापासून कला, क्रीडा शिक्षक पद भरतीसाठी सकारात्मक निर्णयाची आश्वासन

मुंबई :- कला शिक्षक पद भरती करिता शालेय शिक्षण मंत्री यांना साकळे .गेल्या 10वर्षा पासून कला, क्रीडा शिक्षकांचे पद शिक्षक पद संच मान्यते मध्ये समाविष्ट नसल्याने राज्यातील असंख्य शाळान मध्ये कला, क्रीडा शिक्षकांचे सेवानिवृत्ती नंतर झालेल्या हजारो रिक्त पदी शासन स्तरावरून अदयाप पर्यंत पद भरती न झाल्यामुळे शालेय स्थरावर विद्यार्थ्यांना कला, क्रीडा विषय अध्यापना करिता शिक्षक नसल्या मुळे विदयार्थ्यांच्या शारीरिक, कल्पना विकासास बाधा पोहचलेली आहे. कला शिक्षक पद संच मान्यते मध्ये प्रविस्ट करण्यात येऊन कला, क्रीडा पद भरती करण्यासाठी विदर्भ कला शिक्षक संघांचे वतीने गेल्या अनेक वर्षा पासून अविरत पाठपुरावा सुरू असून अखेर 2024मध्ये शासन स्तरावरून कला, क्रीडा शिक्षक पद संच मान्यते मध्ये समाविष्ट करून संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले परंतु कला, क्रीडा शिक्षक पद भरती बाबत शासन स्तरावरून कोणताही निर्णय न झाल्यामुळे विदर्भ कला शिक्षक संघांचे संस्थापक अध्यक्ष विनोद इंगोले यांनी अर्थ संकल्पीय अधिवेशन कालावधीत मुबंई येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. दादा भुसे साहेब, शिक्षण उपसचिव मा. तुषार महाजन, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा. सुधाकर अडबाले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कला, क्रीडा शिक्षक पद भरती बाबत विनाविलंब शासन स्तरावरून सकारात्मक निर्णय होण्यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन चर्चा केली. यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब, शिक्षण उपसचिव तुषार महाजन यांनी 2025 शैक्षणिक सत्रा मध्ये कला, क्रीडा शिक्षक पद भरती बाबत सकारात्मक निर्णय होण्याबाबत संघटने चे संस्थापक अध्यक्ष विनोद इंगोले यांना स्पष्ट आश्वासन दिले असल्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रा पासून विद्यार्थ्यांना कला, क्रीडा विषय अध्यापणा करिता शिक्षक मिळणार असल्यामुळे निश्चितच शालेय स्तरावर आनंद दायी शिक्षण पुन्हा साकार होणार असल्याचे विदर्भ कला शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष मुख्याध्यापक आशिष देशमुख यांनी कळविले आहे.