अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये विद्यापीठातील विद्याथ्र्यांनी पटकाविले पारितोषिके

अमेठी विद्यापीठ, उत्तर प्रदेश (नोएडा), नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर युवा महोत्सव स्पर्धेमध्ये देशभरातील 148 विद्यापीठांच्या कलावंत विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कलावंत चमूने उत्कृष्ट सादरीकरण करुन तब्बल 04 पारितोषिके पटकाविली. चमूमध्ये पाश्चिमात्य वाद्य संगीत कलाप्रकारामध्ये प्रथमेश अडाळगे याला तृतीय पारितोषिक, फाईन आर्ट (पोस्टर मेकींग) कलाप्रकारामध्ये कु. प्रगती सुधा हिला तृतीय पारितोषिक, सुगम संगीत कलाप्रकारात मोहम्मद अबसार मोहम्मद साबीर याला तृतीय पारितोषिक व शास्त्रीय तालवाद्य कलाप्रकारामध्ये चेतन खापरे याला चतुर्थ पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
विद्याथ्र्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी त्यांचा सत्कार करुन पुढे म्हणाले, कलावंत विद्याथ्र्यांनी अतिशय मेहनत घेवून आपल्या कला राष्ट्रीय स्तरावर सादर करुन प्राविण्य मिळविले आहे. त्यांच्या रुपाने विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळीवर पोहचल असून, ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे. भविष्यात आमचे कलावंत विद्यार्थी विविध कलाक्षेत्रात आणखी उत्तुंग भरारी घेतील, असा वि·ाास त्यांनी व्यक्त करुन विजयी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले व त्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्यात. विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता मोठ¬ा प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या विभागातून विद्याथ्र्यांना सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
विद्याथ्र्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे व विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. सावन देशमुख व प्रा. नेत्रा मानकर यांनी काम पाहिले. यशस्वी विद्याथ्र्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.