AmravatiLatest News
उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या विशेष उपस्थितीत रंगोत्सवाची धमाल

आज अमरावतीत उत्सवाचा रंग उधळला गेला. होळीच्या पार्श्वभूमीवर पुष्करणा फाउंडेशन आणि पुष्करणा सत्संग मंडळाच्या वतीने ‘फाग महोत्सव 2025’ चं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली
"सिटी न्यूज कार्यालयात फाग महोत्सव 2025 चा जल्लोष! भारतीय हिंदी पुस्तकालय आणि सिटी न्यूजच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या रंगोत्सवात अमरावती जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके उपस्थित होते. सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. होळीच्या पार्श्वभूमीवर डफलीच्या तालावर नागरिकांनी जल्लोष साजरा केला."
"तर, अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला फाग महोत्सव 2025! होळी हा रंगांचा आणि माणुसकीचा सण. या सणाच्या माध्यमातून समाजात बंधुभाव वाढावा.