फाग महोत्सव 2025 – श्री महाकाली शक्तिपीठ प्रतिष्ठानचे शक्ती महाराज यांची विशेष उपस्थिती!

आज आपण बोलणार आहोत अमरावतीत साजऱ्या झालेल्या भव्य फाघ महोत्सव 2025 विषयी! सिटी न्यूजच्या कार्यालयात पार पडलेल्या या रंगारंग सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते.
“भारतीय हिंदी पुस्तकालय आणि सिटी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने, पुष्करणा फाउंडेशन आणि पुष्करणा सत्संग मंडळ अमरावती यांच्या सहकार्याने फाघ महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले. होळीच्या पार्श्वभूमीवर साजऱ्या या विशेष सोहळ्यात शक्तिपीठाधीश्वर शक्ती महाराज यांनी उपस्थिती लावली. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून उत्सवाला सुरुवात झाली. यावेळी डॉक्टर चंदू सोजतीया यांनी शक्ती महाराजांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि सर्वांना होळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या…”
“फाघ महोत्सव 2025 च्या या भव्य आयोजनाने संपूर्ण अमरावतीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले. होळी हा फक्त एक सण नसून, तो रंगांचा, आनंदाचा आणि एकात्मतेचा उत्सव आहे.