फाघ महोत्सव 2025 – अमरावती महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

आज अमरावतीत उत्साह आणि आनंदाचा माहोल आहे! फाघ महोत्सव 2025 चे सिटी न्यूजच्या कार्यालयात आयोजन भव्य स्वरूपात करण्यात आले आहे. या सोहळ्यात अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे सपत्नीक उपस्थित होते. चला पाहूया या रंगतदार सोहळ्याचा खास अहवाल…”
“अमरावतीत पुष्करणा फाउंडेशन आणि पुष्करणा सत्संग मंडळ यांच्या वतीने फाघ महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले. सिटी न्यूजच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सपत्नीक उपस्थित राहून विधिवत उद्घाटन केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन आणि एकमेकांना रंग लावून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी सचिन कलंत्रे यांनी होळीच्या शुभेच्छा देत डफलीच्या तालावर ताल धरला आणि उपस्थितांनाही नाचण्यास प्रवृत्त केले…”
“तर प्रेक्षकहो, अमरावतीत आजचा दिवस संगीत, रंग आणि आनंदाचा ठरला. फाघ महोत्सव 2025 ने शहरभर जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. सिटी न्यूज तुमच्यासाठी असेच खास रिपोर्टिंग घेऊन येत राहील.