अमरावतीत परवानगीशिवाय होळी इव्हेंट – पोलिसांची कारवाई!

अमरावती शहरात होळी आणि रंगपंचमीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा झाला, मात्र काही ठिकाणी पोलिसांच्या परवानगीशिवाय आयोजीत इव्हेंटवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रेड्डी यांनी आधीच इशारा दिला होता की बेकायदेशीर इव्हेंटवर कडक कारवाई होईल. तरीही काही ठिकाणी नियम तोडण्यात आल्याने आता पोलिसांनी कठोर पावलं उचलली आहेत.
“गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फनलँड येथे होळी इव्हेंट आयोजित करण्यात आले होते, मात्र याला कोणतीही पोलिसांची परवानगी नव्हती. परिणामी, बडनेरा येथील प्रशिक चव्हाण आणि सागर यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या ठिकाणी सुविधा न दिल्याने उपस्थित युवकांनी संताप व्यक्त केला आणि मोठा गोंधळ उडाला.” “याचप्रमाणे बडनेरा मार्गावरील रेणुका लॉन येथेही पोलिसांना परवानगीशिवाय इव्हेंट सुरू असल्याचे आढळून आले. राजापेठ पोलिसांनी या ठिकाणी धडक कारवाई करत आयोजक सार्थक याउल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.”
“अमरावती पोलिसांनी आता बेकायदेशीर इव्हेंट आयोजकांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. भविष्यात अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे, अन्यथा कठोर कारवाई होणार, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पाहूया, या कारवाईमुळे आयोजक आता काय भूमिका घेतात.