अमरावती महानगरपालिका च्या क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन थाटात, क्रिकेट व हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन

अमरावती महानगरपालिका तर्फे महानगरपालिकेतील कार्यरत अधिकारी, कर्मचारी ,शिक्षक व महिला कर्मचारी यांच्याकरिता आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच स्थानिक पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय चे क्रीडांगण येथे महानगरपालिका उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री योगेश पिठे यांच्या हस्ते पार पडले. उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी मुख्य लेखापरीक्षक श्री श्याम सुंदर देव ,मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय फिसके, कर्मचारी संघटनेचे श्री प्रल्हाद कोतवाल, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले ,पशु शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, बाजार परवाना अधीक्षक श्री उदय चव्हाण, शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अधीक्षक प्रवीण इंगोले,शाळा निरीक्षक योगेश पखाले क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे गुलशन मीराणी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपयुक्त श्री नरेंद्र वानखडे, श्री श्याम सुंदर देव यांनी सामन्यापूर्वी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
या क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळामध्ये महिलांच्या दोन संघांनी सहभाग नोंदविला होता त्यामध्ये आरोग्य विभाग व शिक्षक यांचे दरम्यान पहिला सामना रंगला यामध्ये मनपा महिला शिक्षिका यांनी विजय नोंदविला.
तसेच पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये झोन नंबर एक ,झोन नंबर दोन, झोन नंबर तीन , जोन क्रमांक पाच ,लेखा विभाग व सामान्य प्रशासन विभाग अशा सहा संघांनी सहभाग नोंदविला होता.
सेमी फायनल मध्ये झोन क्रमांक एक व झोन क्रमांक तीन यांनी प्रवेश केला असून लेखा विभाग चा संघ फायनलमध्ये प्रवेशित झालेला आहे. रविवारी याच मैदानावर फायनल चा सामना खेळवला जाईल .
तसेच अंबापेठ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सायंकाळी व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले असून यामध्ये सहा संघांनी सहभाग नोंदविलेला आहे.
स्पर्धेचे बक्षीस वितरण 17 मार्च 2025 सोमवार रोजी अंबापेठ स्पोर्ट्स क्लब येथील मैदानावर मा.मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांचे हस्ते सायंकाळी सहा वाजता होणार आहे.