धुळवडीच्या रंगतदार सोहळ्यात 53वे मूर्ख संमेलन उत्साहात संपन्न!

होळीच्या सनानिमित्त अकोल्याच्या खास आणि आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक सोहळा — ‘मूर्ख संमेलन 2025’. होय, गेली तब्बल 53 वर्षे ही परंपरा अखंड सुरू असून दरवर्षी धुळवडीच्या दिवशी हा रंगारंग कार्यक्रम पार पडतो. हास्य, विनोद, संगीत आणि रंगांची उधळण असलेला हा सोहळा अकोल्याच्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान राखून आहे.
धुळवडीच्या सणाला अकोला शहरात एक अनोखी सांस्कृतिक परंपरा जपली जाते – मूर्ख संमेलन! १९७२ पासून सुरू झालेल्या या संमेलनाने अकोल्याच्या सांस्कृतिक वारशात आपली वेगळी छाप उमटवली आहे. सुरुवातीला मानेक थिएटरसमोर झालेल्या या कार्यक्रमाने कॉटन मार्केट आणि खुले नाट्यगृहाचा मार्ग घेत, अखेर गेल्या ३० वर्षांपासून स्वराज भवन पटांगण येथे आपले ठिकाण मिळवले आहे.
या संमेलनात हास्य कविता, होळी गीतांवर नृत्य, व्यंगचित्र सादरीकरण आणि विविध विनोदी कार्यक्रमांचा समावेश असतो. उत्तर भारतातील धुळवडीच्या मूर्ख संमेलनाची हीच परंपरा अकोल्यातही मोठ्या उत्साहाने पाळली जाते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येऊन हास्याची मेजवानी लुटतात. त्यामुळेच दरवर्षी हजारो अकोलेकर मोठ्या संख्येने हजेरी लावून या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतात.
“तर प्रेक्षकांनो, हास्य कविता, होळी गीतांवरील नृत्य आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी या सोहळ्याला एक वेगळीच रंगत आणली आहे अशाच रंगतदार, आनंददायी आणि सांस्कृतिक परंपरेचा साक्षीदार होण्यासाठी पुढील वर्षी तुम्हीही या! हास्य, रंग आणि जल्लोषाची ही धुळवड खासच ठरली.