नमराह हज टूर्सचा संचालक तीन जणांचे पैसे घेऊन फरार!
“उमरा यात्रेसाठी संपूर्ण नियोजन केल्यानंतर मुंबईला पोहोचलेल्या भाविकांना फसवणुकीला सामोरे जावे लागले. अकोल्यातील प्रसिद्ध नमराह हज टूर्सचा चालक मोहम्मद तस्नीम भाविकांचे पैसे घेऊन फरार झाला. त्यामुळे भाविकांनी मोठ्या आशेने भरलेली रक्कम गमावली आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित भाविकांनी आरोपीवर कठोर कारवाईसह संपूर्ण रक्कम परत मिळावी, अशी मागणी केली आहे.”
अकोल्यातील प्रसिद्ध नमराह हज टूर्सचा चालक मोहम्मद तस्नीम भाविकांचे 3.90 लाख रुपये घेऊन फरार झाला आहे. उमरा यात्रेसाठी संपूर्ण तयारी करून मुंबईला पोहोचलेल्या भाविकांची फसवणूक करण्यात आली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
“या घटनेनंतर नमराह हज टूर्सचा चालक फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भाविकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली असून, आरोपीवर कठोर कारवाईसह त्यांचे पैसे परत मिळावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.