Crime NewsLatest News
नवी मुंबई हादरली! शाळेच्या बस चालकानेच केला 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार

शाळेच्या बस चालकाने 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुरुवारी पनवेलमध्ये 3 मार्च रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलगी कॉलेजला जात असताना तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला त्याच्या स्कूल व्हॅनमध्ये आमिष दाखवून नेले. या तरुणीला चिंचवडी शिवारा येथे निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.
त्यांनी सांगितले की, पीडितेने गुरुवारी तिच्या पालकांना बलात्काराची माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्या व्यक्तीला 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.