LIVE STREAM

Accident NewsLatest News

 नादुरुस्त ट्रकला बसची जोरदार धडक; भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू, 11 ते 12 प्रवासी जखमी

   चंद्रपूर शहरातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. यात नादुरुस्त ट्रकला बसने जोरदार धडक  दिली असून या भीषण अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यातील जखमींपैकी 3 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही घटना घडली असून या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 
 11 ते 12 प्रवासी जखमी, 3 जणांची प्रकृती चिंताजनक
    पुढे आलेल्या माहितीनुसार, ही बस नागपूरवरून चंद्रपूरकडे येत होती. दरम्यान, रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास  हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात कंडक्टरचा मृत्यू झालाय. तर 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. संदीप वनकर असं मृत कंडक्टरचं नाव असून ते चंद्रपूर शहरातील नगीना भाग परिसरातील निवासी आहे. यातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. ड्रायव्हरने कुठलेही सुरक्षा नियम न पाळता नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

रंगपंचमीच्या दिवशी एकाचा धरणात बुडून मृत्यू
धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी एकाच बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद येथील धरणावर घडली. आठ जण पोहण्यासाठी गेले होते, त्यापैकी पाच जण अचानक बुडायला लागले. त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले, मात्र यातील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय, तर एकाचा शोध सध्या सुरू आहे. बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सध्या सुरू आहे. घटना घडल्यानंतर बराच वेळ शोध घेतला. मात्र कालांतराने अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.

 पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी दोघांची नावे आहे. ते दोघे अरुण भोईर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान बोटीच्या सहाय्याने पाच पैकी तिघांना वाचविण्यात यश आले. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. सध्या त्याचा शोध घेतला जात असून अधिक तपास कळंब पोलीस करीत आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!