Crime NewsLatest NewsMaharashtra
पुण्यात अत्यंत भयानक हत्याकांड! हात पाय कट करून वेगवेगळ्या विहिरीत फेकून दिले शीर आणि धड

पुणे जिल्ह्यात अत्यंत भयानक हत्याकांड घडले आहे. एका तरुणाची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली आहे. तरुणाचे हात पाय कट करून शीर आणि धड वेगवेगळ्या विहिरीत फेकून देण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेला तरुण परिक्षेला जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. मागील 8 दिवसांपासून तो बेपत्ता होता अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.
पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एका विहिरीत हात पाय आणि शीर कट केलेले अवस्थेतील एक धड आढळून आलं होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत दाणेवाडी गावातून मिसिंग झालेला 18 वर्षांचा माऊली गव्हाणेच आहे का या अनुषंगाने तपास सुरू केला होता. माऊली गव्हाणे हा 6 मार्चला शिरूर येथे बारावीच्या पेपर साठी आल्यानंतर मिसिंग झाला होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता.
अखेर आज याच दाणेवाडी गावातील दुसऱ्या एका विहीरीत शीर आणि हात पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या दोन वेगवेगळ्या विहिरींमध्ये आढळलेले शीर आणि धड याची ओळख पटली असून माऊली गव्हाणे या 18 वर्षीय तरुणाचाच हा मृतदेह असून माऊलीची एवढ्या कृर निरघृपने हत्या कोणी केली या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत. या धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका अठरा वर्षाच्या तरुणाची हातपाय कट करून अमानूष पने हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक आहे.