भीषण आग! चांदुर रेल्वेतील सेंट्रल बँक जळून खाक

चांदुर रेल्वे येथे सेंट्रल बँकेला भीषण आग! शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बँकेतील सर्व साहित्य आणि रोकड जळून खाक. घटनास्थळी अग्निशामक दल, पोलिसांचा ताफा, आणि नागरिकांची मोठी गर्दी! सुदैवाने जीवितहानी टळली, पण वित्तहानी प्रचंड!
“ही घटना आज सकाळी चांदुर रेल्वे शहरात घडली. सेंट्रल बँकेत अचानक धूर येऊ लागल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणातच आगीने संपूर्ण बँकेला विळखा घातला आणि जोरदार ज्वाळा आकाशात भडकू लागल्या. बँकेतील रोकड, महत्त्वाची कागदपत्रे, फर्निचर—सर्व काही जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आगीची माहिती मिळताच चांदुर रेल्वे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीचे प्रमाण मोठे असल्याने धामणगाव आणि तीवसाहूनही अग्निशामक बंब बोलवावे लागले. दरम्यान, आगीमुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता पसरली असून बँकेबाहेर लोकांनी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त वाढवला असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.” “सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली आणि किती नुकसान झाले?