City CrimeLatest News
रंगाचा वाद, युवकावर ब्लेडने हल्ला!
“रंगपंचमीचा सण जल्लोषात साजरा होत असताना अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. गणेश कॉलनीत रंग न लावू दिल्यामुळे युवकाने दुसऱ्या युवकावर थेट ब्लेडने हल्ला केला.
अमरावतीच्या गणेश कॉलनीत रंगपंचमीच्या दिवशी रंग न लावू दिल्याने मोठा गोंधळ उडाला. आरोपी विघ्नेश पाटील याने फिर्यादी निलेश इंगळे यांच्यावर ब्लेडने हल्ला केला आणि जखमी केलं. या घटनेनंतर आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला.
“या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.