विद्यापीठात 18 मार्च पासून भव्य ‘लोकनाट¬ महोत्सव-2025’ चे आयोजन, महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यांच्या लोकनाट¬ाचे तीन दिवस सादरीकरण

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 18 ते 20 मार्च, 2025 दरम्यान भव्य ‘लोकनाट¬ महोत्सव - 2025’ चे विद्यापीठ परिसरातील विद्यार्थी विकास विभागाच्या रंगमंचावर आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
दि. 18 मार्च रोजी सकाळी 10.30 वा. लोकनाट¬ महोत्सवाचे उद्घाटन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर येथील संचालक श्रीमती आस्था कार्लेकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्रमुख अतिथी म्हणून कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे सहायक संचालक श्री दिपक कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी श्री एम.टी. नाना देशमुख, विद्यापीठ व्य.प. सदस्य डॉ. विद्या शर्मा, आंतर विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैशाली गुडधे, मानवविज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सत्रानंतर लगेच दु. 12 वा. महाराष्ट्र राज्याच्या कोंकणातील दशावतार लोकनाट¬ाचे सादरीकरण, त्यानंतर प्रादर्शिक कला -नृत्य व नाट¬ विभागाचे स्नेहसंमेलन-प्रथम नृत्य-नाट¬ उत्सव, दुस-या दिवशी 19 मार्च रोजी सकाळी 11.00 वा. कथक नृत्य, रानभूल एकांकिका, एका चोरीचे आर्थिक पृथ्थकरण एकांकिका व दु. 3.00 वा. तेलंगाणा राज्याचे चिंदु यक्षगान लोकनाट¬ाचे सादरीकरण, त्यानंतर छत्तीसगड राज्याचे नाचा लोकनाट¬ाचे सादरीकरण, सायंकाळी 7.00 वा. अभिरुची कला व क्रीडा मंदिर, अमरावती निर्मित आणि डॉ. श्याम देशमुख दिग्दर्शित प्रसिध्द नाटककार श्री विजय तेंडुलकर यांचे ‘कमला’ हे दोन अंकी ग्रे नाटक होईल. तिस-या दिवशी 20 मार्च रोजी मध्यप्रदेश राज्याचे स्वांग लोकनाट¬ाचे सादरीकरण, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पारंपारिक तमाशा लोकनाट¬ाचे सादरीकरण होईल.
सायंकाळी 5.00 वा. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरचे सहा. संचालक श्री दिपक कुलकर्णी, विद्यापीठ व्य.प. सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, डॉ. प्रवीण रघुवंशी, डॉ. आर.डी. सिकची, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी व नाट¬ दिग्दर्शक, पुणे येथील श्री संजय कुळकर्णी, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय वि·ाविद्यालय, वर्धा येथील नाट¬ व रंगभूमि विभागाचे डॉ. सतिश पावडे, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप काळे, प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक डॉ. भोजराज चौधरी उपस्थित राहणार आहेत. तरी या लोकनाट¬ महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. भोजराज चौधरी, डॉ. राहुल हळदे, डॉ. मोहन बोडे, डॉ. मनोज उज्जैनकर यांनी केले आहे.