Latest NewsMaharashtra
‘हे लोक मला हाल हाल करून मारतील’, त्रास देणाऱ्यांची नाव लिहून बीडमध्ये शिक्षकाची आत्महत्या

बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच आता बीडच्या स्वराज नगर भागात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिक्षकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, फेसबुक पोस्टवर केलेल्या सुसाईड नोटवरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
बीड शहरातील स्वराज नगर भागात सकाळच्या सुमारास कृष्ण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बाहेर एका व्यक्तीने एसीच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. धनंजय नागरगोजे असं या शिक्षकाचे नाव असून ते कोळगाव येथील कायम विनाअनुदानित आश्रम शाळेवर शिक्षक होते.
फेसबुक पोस्टमध्ये काही व्यक्तीच्या नावांची नोंद
2019 मध्ये राज्य सरकारने 20 टक्के अनुदान घोषित केले होते. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे धनंजय नागरगोजे यांना अनेक अडचणी येत होत्या. असे कारण सध्या सांगितले जात आहे. धनंजय नागरगोजे यांनी शुक्रवारी होळीच्या दिवशी फेसबुक पोस्ट करून आत्महत्या करत असल्याचं सांगितले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काही व्यक्तींची नावे देखील नोंदवली आहेत. आता यावरूनच पोलीस या घटनेचा तपास करत आहे.
धनंजय नागरगोजेंच्या फेसबुक पोस्टमध्ये काय?
श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफकर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही. बाळा तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागले. काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही. श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला अजून काही कळत नाही तूझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही.बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे.
विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकरते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मरणार आहेत. माझ्या मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की, मी तुमच्या शाळेवर गेली 18 वर्षे झालं काम करतोय अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि तीतून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकणी ठेवला नाही . बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्या शिवाय पर्याय नाही.