अमरावती जिल्हा नूटा कार्यकारणीची पंचवार्षिक निवडणूक अविरोध
अमरावती :- नागपूर विद्यापीठ टीचर असोसिएशन (नूटा) संघटनेच्या अमरावती जिल्हा कार्यकारणीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला.
या निवडणूक प्रक्रियेसाठी अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी प्राचार्य डॉ. विजयकुमार भांगडिया यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. तसेच डॉ. रविंद्र मुंद्रे आणि डॉ. आशिष राऊत यांनी निरीक्षक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.
अमरावती जिल्हा नुटा निवडणुकीत नूतन कार्यकारिणीत पुढील सदस्यांची निवड करण्यात आली :
अध्यक्ष: डॉ. तीर्थराज रॉय, केसरबाई महाविद्यालय,अमरावती उपाध्यक्ष: डॉ. प्रवीण इंगळे, गो.सी.टोम्पे महाविद्यालय,चांदूरबाजार सचिव: डॉ. सौरभ घोगरे, आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे,सह-सचिव: डॉ. वैशाली देशमुख, शिवाजी सायन्स महाविद्यालय,अमरावती तर सदस्य म्हणून डॉ.दिनेश पुंड, आर.आर.लाहोटी महाविद्यालय, मोर्शी, डॉ.सुनील बेलसरे,जगदंबा महाविद्यालय अचलपूर,डॉ. नितेश चोरे ,विनायक सायन्स महाविद्यालय, नांदगाव खंडेश्वर यांची अविरोध निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्रातील एकसंघ आणि प्रभावी संघटना म्हणून नुटा कार्यरत असल्याचे सांगितले. संघटनेचे ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेत आज तरुण प्राध्यापकाची संघटनेकडे असणारी उपस्थिती आणि सहभाग अत्यंत कौतुकास्पद असल्याचे विचार डॉ.प्रवीण रघुवंशी यांनी प्रतिपदित केले
निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य डॉ.विजयकुमार भांगडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नुटा संघटनेमुळे शिक्षकांना सन्मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. तसेच वेतन आणि सेवाशर्ती संबंधित अडचणी सोडवण्यासाठी संघटना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
माजी अध्यक्ष डॉ.महेंद्र मेटे आणि डॉ. तीर्थराज रॉय नवनिर्वाचित अध्यक्ष नूतन कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर प्रभावी निर्णय घेतले जातील आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना कार्यरत राहील, असा विश्वास या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!