LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती पोलिसांनी निराधारांसोबत साजरी केली रंगपंचमी!

अमरावती :- निराधारांना रंगपंचमीचा आनंद मिळावा, त्यांनाही समाजाचा एक भाग असल्याची जाणीव व्हावी, यासाठी अमरावती पोलिसांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला. बडनेरा येथील आधार शहरी बेघर निवारा केंद्रात रंगांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पाहूया हा खास रिपोर्ट :

बडनेरा पोलिसांनी बेघर निराधारांसोबत रंगपंचमी साजरी करत एक अनोखा सामाजिक संदेश दिला. डीजेच्या तालावर पोलिस आणि रहिवासी एकत्र नाचताना दिसले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त कैलास फुंडकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी अल्पोपहाराचे वितरणही करण्यात आले.

पोलिसांचा हा सामाजिक उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अमरावती पोलिसांनी रंगपंचमीच्या निमित्ताने समाजातील दुर्बल घटकांसोबत आनंद साजरा करत माणुसकीचे नाते अधिक दृढ केले आहे. अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी पाहत राहा City News.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!