आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची आढावा बैठक | निवडणुकीपूर्वी पक्षाची मोठी तयारी!

अमरावती :- आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने तालुका स्तरीय आढावा बैठक आयोजित केली.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
पाहूया हा विशेष रिपोर्ट
भातकुली तालुक्यातील आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या.ही बैठक आष्टीच्या जुनिअर कॉलेज सभागृहात पार पडली. या वेळी अमरावती जिल्हा अध्यक्ष अनिल जळमकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्करराव ठाकरे, नाना बोंडे, शिवा मोहोड, तालुकाध्यक्ष बंडू वरठे, संघपाल वानखडे, वसीम भाई, रशीद भाई आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीत युवा कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती, ज्यामुळे पक्षाच्या भविष्यासाठी नवा उत्साह आणि जोश दिसून आला.पक्षाची पुढील रणनिती काय असेल? कार्यकर्त्यांची तयारी कशी राहील? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे!
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सज्ज झाल्याचे स्पष्ट दिसत आहे! कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली. पुढील निवडणुकीत पक्ष कसा कामगिरी करतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे! अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज .