जम्मू काश्मीरमधील यात्रेकरूंच्या बस हल्ल्याचा मास्टरमाईंड अबू कताल गोळीबारात ठार

जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील मंदिरातून परतणाऱ्या तीर्थयात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अबू कतालला अज्ञाताने गोळीबारात ठार केलंय . लष्कर ए तय्यबा या दहशतवादी संघटनेतील हा क्रूरकर्मा शनिवारी (15मार्च) रात्री पाकिस्तानात एका हल्ल्यात ठार झालाय . मुंबईत झालेल्या 26 / 11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदचा हा जवळचा साथीदार होता .
दरम्यान पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जफर एक्सप्रेस ट्रेनवर झालेल्या हमल्यावरून पाकिस्तानी सैन्याने भारतावर गंभीर आरोप लावले आहेत .डीजीआयएसपीआर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला आहे की बलुचिस्तान मधील दहशतवादाला भारताकडून आर्थिक मदत केली जातेय.
अबू कताल कसा मारला गेला?
पाकिस्तान मधील झेलम येथे शनिवारी सायंकाळी अबु कतालवर अज्ञाताने गोळीबार केला .त्यावेळी हाफीज सईददेखील त्याच्याबरोबर होता .हल्ल्यानंतर हाफीज सईदने तिथून पळ काढला . जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला लष्कर ए तयबा या दहशतवादी संघटनेचा महत्त्वाचा ऑपरेटिंग असलेला कताल पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झेलम येथे अज्ञात बंदूकधार्यांकडून गोळीबारात ठार झाला .मुंबईत झालेल्या 26 /11 च्या हल्ल्यात प्रमुख सूत्रधार असलेल्या हाफिज सईदचा हा पुतण्या होता. तसेच काही महिन्यांपूर्वी रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या एका बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता . या हल्ल्याचा मास्टरमाइंड अबू कटाल होता .दरम्यान पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अबू कतालची हत्या करण्यात आली आहे . प्राथमिक माहितीनुसार अबू कटालचा याचा जागेवरच मृत्यू झाला तर एक बडा नेता गंभीर जखमी झाला होता .त्याला वाचविण्यात अपयश आल्याचे सांगितले गेले .या हल्ल्यानंतर एका बड्या नेत्याला एका अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचे सांगितले जात आहे .शनिवारी रात्री झेलम मधील मंगला बायपास जवळ मोटरसायकल वरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडून अबू कताल या हाफिज सईदच्या पुतण्याला ठार केले .
पाकिस्तानी ट्रेन अटॅकवरून पाकिस्तानी लष्कराचा भारतावर गंभीर आरोप
पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांनी मंगळवारी क्वेटा येथून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस या प्रवासी रेल्वे गाडीवर हल्ला चढवला होता .या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान ब्रिटन आणि अमेरिकेने बंदी घातलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेने घेतली .या ट्रेन अपहरणानंतर 182 प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा करण्यात आला होता .हा दावा पोलिसांनी खोडून काढला 350 प्रवासी सुखरूप असल्याचेही माहिती पोलिसांनी दिली .मात्र या जाफर एक्सप्रेस हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतावर गंभीर आरोप केले आहेत .डीजीआयएसपीआर लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असा आरोप केला आहे की बलुचिस्तानमधील दहशतवादाला आर्थिक मदत भारताकडून केली जात आहे .