LIVE STREAM

Amaravti GraminCrime NewsLatest News

धारणी पोलीसांची धडक कारवाई: मध्य प्रदेश सिमेवर गौतस्करी हाणून पाडली!

धारणी :- मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अवैध गौतस्करीचा मोठा प्रयत्न धारणी पोलिसांनी उधळून लावला आहे. 33 गौवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश आले असून, 6.5 लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली.

संपूर्ण घटनेचा आढावा घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये :

धारणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मध्य प्रदेशातील देडतलई आणि महाराष्ट्राच्या भोकरबर्डी सिमेवर मोठ्या प्रमाणात गौवंश तस्करी सुरू असल्याचे समजले. त्यानंतर ठाणेदार अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी त्वरित मोहिम राबवली.

या मोहिमेत पोलिसांनी 33 गौवंशांची निर्दयी तस्करी रोखली आणि त्यांना जीवदान दिले. पकडलेल्या मुद्देमालाची किंमत जवळपास 6.5 लाख रुपये आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सतिश झाल्टे, हंकारे, कास्देकर, मोहीत आकाशे, राम सोळंके, जीवन गोडंबे, गजानन जामनी, कुंदन नंदवंशी, मंगेश मानमोडे, सुहास डाहके आणि सुजित वानखेडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहीत आकाशे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. धारणी पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संपूर्ण परिसरात समाधानाचे वातावरण आहे. गौरक्षकांनी पोलिसांचे भरभरून कौतुक केले आहे.

धारणी पोलिसांनी दाखवलेली सतर्कता आणि तडफदार कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गौतस्करी रोखली गेली आहे. या कारवाईबद्दल पोलिसांचे कौतुक होत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा City News.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!