बर्ड फ्लूच्या दहशतीनंतर अकोटमध्ये अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्यूमुखी

अकोला :- बर्ड फ्लूची दहशत अद्याप संपलेली नाही, तोच अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात कोंबड्यांमध्ये अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे. मुंडगाव परिसरात शेतकऱ्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अचानक कोंबड्या आणि काही पक्ष्यांचे मृत्यू होत आहेत. यामुळे कुक्कुटपालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून याचे निदान करण्याची मागणी होत आहे.
पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट..
अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरात अचानक कोंबड्यांचा मृत्यू होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते, कोंबड्यांना ताप येत असून काही तासांतच त्यांचा मृत्यू होत आहे. हा कोणता आजार आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे या भागातील पोल्ट्री व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे .
कोंबड्यांचा हा अज्ञात आजार बर्ड फ्लू आहे की काहीतरी वेगळं, याचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. जर लवकरच यावर नियंत्रण मिळवलं नाही, तर संपूर्ण कुक्कुटपालन उद्योग अडचणीत येऊ शकतो. नागरिक आणि पोल्ट्री व्यावसायिक प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून आहेत. पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा City News.