मुदखेड तालुक्यातील बारड-दुधनवाडी-मुगट रस्त्याची दुरावस्था!

नांदेड :- मोठमोठ्या शहरांना जोडणारे महामार्ग झपाट्याने विकसित होत असले तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मुदखेड तालुक्यातील बारड-दुधनवाडी-मुगट रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
पाहूया हा विशेष रिपोर्ट…
मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मोठे खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि सतत होणारे अपघात गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. हा रस्ता तब्बल दहा गावांना जोडणारा असून ये-जा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची नितांत आवश्यकता आहे. मात्र, बारड-दुधनवाडी-मुगट रस्ता हा अपघातांचा सापळा ठरत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा विषय लवकरच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पाहत राहा City News.