LIVE STREAM

AmravatiHelth CareLatest News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्तदान शिबिर | 25 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग!

अमरावती :- रक्तदान म्हणजे जीवनदान! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तपोवन नगर, राहुल नगर सायं शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 25 रक्तदात्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महानगर प्रचारक सुमधुर गोखले यांच्या हस्ते झाले.

पाहूया या सामाजिक उपक्रमाचा विशेष अहवाल :

रक्तदान हेच श्रेष्ठ दान!” या उदात्त भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तपोवन नगर, राहुल नगर सायं शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार, 16 मार्च 2025 रोजी, महर्षी सुदर्शन सुपच मंदिर परिसरातील हॉलमध्ये हा उपक्रम पार पडला. या शिबिरात 25 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर प्रचारक श्री. सुमधुर गोखले यांच्या हस्ते संपन्न झाले. रक्तदान मोहिमेत पुढील युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला स्वप्निल गडवाले, सौरव डोंगरे, गोविंद काळे, नवल चव्हाण आणि इतर अनेक जणांनी रक्तदान करून समाजकार्य केले. अमित कुळवंत आणि मित्र परिवार यांनी या उपक्रमाच्या आयोजनात मोठे योगदान दिले.

रामभाऊ पचेल आणि जयराज चव्हाण यांच्या सहकार्याने कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध झाला. रक्तदानासारख्या सेवाभावी कार्याला प्रोत्साहन मिळावे, समाजात आपलेपणा वृद्धिंगत व्हावा आणि आरोग्यसेवेसाठी मदतीचा हात पुढे यावा, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

रक्तदान हेच जीवनदान! या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे आणि आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन!असेच उपक्रम समाजात पुढेही होत राहावेत, अशीच अपेक्षा! ताज्या सामाजिक घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!