LIVE STREAM

Accident NewsAmravatiLatest News

गिट्टीने भरलेला ट्रक नाल्यात कोसळला; पुलाचा रस्ता खचल्याने झाली दुर्घटना, २ जखमी

अमरावती :- पन्नालाल नगर येथे एक गिट्टीने भरलेला ट्रक पोकळ जाग्यावर जमीन खचल्याने थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत प्रशासनाने काहीच पावले उचलली नाहीत, परिणामी हा अपघात झाला. आता प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? हा मोठा प्रश्न आहे! या घटनेबाबत स्थानिक नगरीकानी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.

पन्नालाल नगर परिसरात बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रक ये-जा करत असतात. मात्र, या भागातील नाल्यावरून जाणारा पूल आणि रस्ता अत्यंत पातळ व कमकुवत असल्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक धोकादायक ठरू शकते. 17 मार्च च्या सकाळी या परिसरात गिट्टीने भरलेला एक ट्रक नाल्याचे पुलाच्या पोकळ रस्त्यावरुण जात असताना ट्रकच्या वजनाने हा रस्ता जमिनीच्या पोकळ जागेत फसला आणि ट्रक अनियंत्रित होऊन तब्बल २ ते ३ पलटण्या घेत नाल्यात पडला. या भीषण अपघातात ट्रक चालक व वाहक जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी याआधीच दिला होता इशारा :

स्थानिक नागरिकांनी यापूर्वीच प्रशासनाला आणि वाहनचालकांना या रस्त्याचा धोकादायक स्वरूपाबाबत सतर्क केले होते. मात्र, प्रशासनाने फक्त तात्पुरत्या उपाययोजना केल्या आणि आज त्याचा परिणाम अपघाताच्या रूपाने समोर आला आहे.

मनपा आयुक्तांनी दिले होते निर्देश – पण काम ठप्प :

नुकतेच मनपा आयुक्तांनी या परिसराचा दौरा करून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश दिले होते. परंतु, या संपूर्ण प्रकरणाला राजकीय स्वरूप मिळाल्याने माजी नगरसेवक मिलिंद बांबल यांच्या राजकीय स्वार्थामुळे हे काम रखडले, असा आरोप परिसरातील नागरिकात चर्चा सुरु आहे.

सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ. चंदू सोजतीया यांच्या घराजवळच अपघात :

या भागातील धोक्याची कल्पना डॉ. चंदू सोजतीया यांनी पूर्वीच प्रशासनाला दिली होती. परंतु, प्रशासनाने केवळ पाहणी करून आश्वासन दिले – प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही.

पोलीस आणि मनपा प्रशासन घटनास्थळी :

अपघातानंतर राजापेठ पोलिस आणि मनपा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

सीटी न्यूजने यापूर्वीही दिला होता धोक्याचा इशारा :

सीटी न्यूजने यापूर्वीच या संभाव्य दुर्घटनेबाबत वारंवार वृत्त प्रसारित केले होते. आज जे झाले ते टाळता आले असते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

आता तरी प्रशासन जागे होईल का?

स्थानिक नागरिकांचा संतप्त सवाल :
प्रशासनाला काही दुर्घटना घडल्याशिवाय जाग येत नाही का? आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील का? प्रशासनाच्या पुढील कृतीवर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

ही घटना प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आणखी एक नमुना आहे. जर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या असत्या, तर आज अपघात टळला असता. आता प्रशासन यावर त्वरित कारवाई करेल का? नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जातील का? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!