चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! | ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला: मकरसंक्रांतीच्या दिवशी अकोला जिल्ह्यात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावण्याच्या घटनांनी खळबळ उडवली होती. या गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला आणि अखेर या गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. चला
पाहूया सविस्तर रिपोर्ट..
अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू आणि मुर्तीजापूर शहरात मकरसंक्रांतीच्या दिवशी झालेल्या चैन स्नॅचिंग प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. भुसावळ येथील कुख्यात इराणी टोळीने या घटनांची अंमलबजावणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अमरावती गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी हसन अली उर्फ अश्शु याला अटक केली आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे तीन साथीदार मुस्तफा इसा अली, हसनैन जाफर अली आणि महू जाफर अली यांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपीच्या घरातून २.३४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ७०,००० रुपये किंमतीची पल्सर मोटारसायकल जप्त केली आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. या संपूर्ण घटनेवर तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या बातम्या पाहत राहा city news