नागपूरमध्ये मद्यधुंद तरुणाकडून हत्या!

नागपूर :- नागपुरात एका छोट्याशा वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले आहे! एका विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने मद्यधुंद अवस्थेत एका कबाडीकाम करणाऱ्या व्यक्तीवर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. नेमकी ही घटना काय आहे, कुठे घडली आणि आरोपी कोण आहे.
पाहूया विशेष रिपोर्टमध्ये :
नागपूर शहरातील धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहुल नगरात ही धक्कादायक घटना घडली. १९ वर्षीय आयुष मंडपे, जो बीएससीच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेतो, त्याचा मद्यधुंद अवस्थेत ३५ वर्षीय अंकुश देवगिरकरसोबत किरकोळ वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर मृतकाने आरोपीची कॉलर पकडली, ज्याचा राग धरून आरोपी घरी गेला आणि चाकू घेऊन आला. त्याने अंकुशच्या पोट आणि पाठीवर गंभीर वार केले, ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
धंतोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या आधी दोघांवरही कोणतेही गुन्हे नव्हते, तसेच पूर्वी कधीही वाद झाल्याची नोंद नाही, असे पोलीस सूत्रांकडून समजते. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे.
दारू पिऊन होणाऱ्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ही घटना केवळ नागपूरपुरती मर्यादित नसून समाजासाठी मोठा इशारा आहे. आपल्या जिवावर उठणाऱ्या या वादांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत आहे. या प्रकरणात आरोपीने कोणत्या मानसिकतेतून हल्ला केला, याचा तपास सुरू आहे. पुढील अपडेटसाठी पाहत राहा City News.