AmravatiLatest News
नागपूर शहरात कबरीवरून वाद, जाळपोळ; अमरावती शहर पोलिस यंत्रणा अलर्ट, बंदोबस्त वाढविला
“नागपूर शहरात कबरीवर वाद, अमरावती शहरात पोलिस यंत्रणा अलर्ट; बंदोबस्त वाढवला, नागरिकांना अफवा पसरवण्याचे इशारे”
अमरावती: नागपूर शहरात कबरीवरील वादामुळे जाळपोळ झाल्यानंतर अमरावती शहरात पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, पोलिस आयुक्त रेड्डी यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणीही नागपूरच्या घटनेशी संबंधित विडिओ व्हायरल करू नयेत, तसेच अफवा पसरवल्यास कडक कारवाई करण्यात येईल.