प्रेमप्रकरणातून विवाह झाल्यानंतर सासरच्यांकडून विवाहितेवर अमानुष अत्याचार

नागपूर :- प्रेमाने जोडलेले नाते अत्याचाराच्या छायेत! नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका विवाहितेवर पती आणि सासरच्या मंडळींनी अमानुष अत्याचार केला. महिलेच्या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकार समोर आला असून, यात मारहाणीचे काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत. संपूर्ण प्रकरण काय आहे.
पाहूया हा सविस्तर रिपोर्ट :
नागपूरच्या अष्टविनायक नगरात प्रेमविवाह केलेल्या महिलेचा छळ होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विवाहितेने केलेल्या आरोपांनुसार, पती, सासू, सासरे आणि नणंद वारंवार तिचा छळ करत होते. पतीच्या दुसऱ्या महिलेशी संबंधांवर तिने आक्षेप घेतल्यावर तिच्यावर जबरदस्त हल्ला करण्यात आला. एवढंच नाही, तर तिला शॉक देऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक दावा महिलेने केला आहे.
संपूर्ण घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर काय उपाय असावेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.