LIVE STREAM

AmravatiCrime NewsLatest News

वाळू तस्करांवर पोलिसांचा मोठा छापा! ₹1.21 कोटींचा मुद्देमाल जप्त | 5 आरोपींवर गुन्हा दाखल | धक्कादायक खुलासा!

अमरावती :- अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे! अंजनगाव सुर्जी येथे पहिल्यांदाच पोलिसांनी वाळू तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. तब्बल ₹1.21 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात युवा स्वाभिमान संघटनेच्या जिल्हाध्यक्षाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर :

परि.सहा. अधीक्षक प्रशांत डगळे यांनी होळीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवला होता. त्याच वेळी, 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता, नवीन बस स्थानक ते विठ्ठल मंदिर परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पोलिसांच्या नजरेत आले.

प्राप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक :

१) MH 37 P 2772
२) MH 27 BX 9644
३) UP 72 BT 8384
यातील वाळू आणि वाहनांसह पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल तब्बल ₹1,21,20,000 चा असून, पाच आरोपींवर खाण आणि खनिज अधिनियम 1957 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी
१) अलताफ मो. सादिक (24) – अंजनगाव सुर्जी
२) मो. सलीम मो. रशीद (54) – कांडली, परतवाडा
३) आबाद अली मो. शरीफ – अमरावती
४) अजय सुरेश देशमुख – चिंचोली
५) मो. साजिद मो. युसुफ – परतवाडा

या आरोपींवर 145/2025 बीएनएस कलम 302 (2) सह कलम 21 खाण आणि खनिज अधिनियम 1957 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर अमरावती जिल्ह्यात वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई वाळू तस्करांसाठी एक मोठा धडा ठरू शकते. पण खरा प्रश्न असा आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असताना, स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांचा यात काही सहभाग आहे का? हाच खरा तपास करण्याची गरज आहे! पुढील अपडेट्ससाठी पाहत राहा सिटी न्यूज.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!