शॉकिंग! रस्ता खचल्यामुळे ट्रक थेट नाल्यात कोसळला | नागरिकांचा संताप | मनपा जबाबदार

अमरावती : अमरावतीतून मोठी बातमीपन्नालाल नगरमध्ये गिट्टी वाहतूक करणारा ट्रक रिव्हर्स घेत असताना रस्ता खचला आणि ट्रक थेट नाल्यात जाऊन कोसळला. या अपघातात चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानीय नागरिकांनी वारंवार प्रशासनाला याचा इशारा दिला होता, पण दुर्लक्ष झालं आणि आज हा अपघात घडला!
या घटनेबद्दल तुमचं मत काय? प्रशासन दोषी आहे का? कमेंटमध्ये सांगा!
प्रशासन कधी जागं होणार? कधीपर्यंत निष्काळजीपणा सुरू राहणार?
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एक भीषण अपघात घडला आहे! पन्नालाल नगर परिसरात ट्रक रिव्हर्स घेत असताना रस्ता खचला आणि तो थेट नाल्यात कोसळला. या अपघातात चालक आणि वाहक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार या रस्त्याच्या दयनीय स्थितीबद्दल तक्रारी केल्या होत्या, पण प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि आज त्या निष्काळजीपणाची मोठी किंमत मोजावी लागली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? प्रशासनाची झोप कधी उघडणार?
पाहुयात सविस्तर रिपोर्ट…
हा अपघात झाल्यानंतर आता प्रशासनाला जाग येणार आहे का? अजून किती लोकांच्या जिवावर उठणार आहे ही निष्काळजी व्यवस्था? आज जर वेळीच हे काम पूर्ण झाले असते, तर हा अपघात टाळता आला असता. आता तरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलली जातील का? की अजून मोठा अपघात होईपर्यंत प्रशासन झोपेतच राहणार? सिटी न्यूजने या समस्येवर आधीही आवाज उठवला होता आणि यापुढेही उठवत राहील!