AmravatiEducation NewsLatest News
इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

अमरावती :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जानेवारी, 2025 पासून सुरू झालेल्या सत्राकरिता प्रमाणपत्र व सेमिस्टर असलेले अभ्यासक्रम सोडून इतर अभ्यासक्रमांकरिता दिनांक 31 मार्च, 2025 पर्यंत प्रवेशास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सविस्तर माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबतची माहिती इग्नोच्या www.ignou.ac.in ह्या वेबसाईटवर तसेच https://ignouadmission.samarth.edu.in/ ह्रा लिंकवर उपलब्ध आहे.
अधिक माहितीकरिता इच्छुकांनी इग्नोचे अभ्यासकेंद्र, मुलींचे वसतीगृहाजवळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे सकाळी 8.30 ते 10.30 या वेळात संपर्क साधावा असे डॉ.वर्षा नाठार, समन्वयक, इग्नो अभ्यासकेंद्र, अमरावती यांनी कळविले आहे.