औरंगजेबाची कबर तातडीने हटवा, अन्यथा कारसेवा – बजरंग दलाचा इशारा

चांदूर बाजार :- चांदूर बाजारमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. बजरंग दलाने औरंगजेबाची कबर तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. अन्यथा लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता.
पाहुया सविस्तर रिपोर्ट :
चांदूर बाजारमध्ये हिंदू संघटनांचा प्रचंड आक्रोश दिसून आला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजी महाराज व्यायाम शाळेतून निघालेल्या मोर्चाने शहरभर घोषणाबाजी केली. ‘बस एक धक्का और औरंग्याकी कबर गिरावो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसीलदार रामदास शेळके यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. बजरंग दलाने सरकारला इशारा दिला आहे की, कबर न हटवल्यास लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे मोर्चा काढला जाईल.
आता सरकार आणि प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धार्मिक भावना दुखावण्याचा आरोप करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुढील काही दिवस या प्रकरणाला काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.