छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने बडनेरा रेल्वे स्थानकाचे प्रतिकात्मक नामकरण

बडनेरा :- बडनेरा रेल्वे स्थानकाच्या नामकरणावरून मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी हिंदू सूर्य प्रतिष्ठानने अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. नव्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाहुयात सविस्तर रिपोर्ट :
अमृत महोत्सवी योजनेंतर्गत बडनेरा रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू सूर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बडनेरा रेल्वे स्टेशन या नावासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. प्रतिकात्मक नामकरणाद्वारे त्यांनी स्थानिक नागरिकांचा आवाज बुलंद केला. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन प्रशासनासाठी धक्कादायक ठरले आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना घटनेची माहिती न मिळणं ही गंभीर बाब मानली जात आहे. हिंदू सूर्य प्रतिष्ठानचे प्रदीप सोळंके यांनी या मागणीवर ठाम भूमिका मांडली आहे.
बडनेरा रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा मुद्दा आता अधिकच तापलेला दिसतोय. प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि सुरक्षेच्या बाबतीत काय पावलं उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मुद्द्यावर आणखी अपडेटसाठी पाहत राहा सिटी न्यूज.