डॉ. गोडे कॉलेजचा तीन दिवसीय मोफत आरोग्य मेळावा

अमरावती :- अमरावतीतील डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने गरजूंसाठी मोठे पाऊल उचलले आहे. 17 ते 19 मार्चदरम्यान आयोजित या तीन दिवसीय महास्वास्थ्य मेळाव्यात रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे.
मार्डी रोडवरील या मेडिकल कॉलेजमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या जसे की एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, ईसीजी, टूडी इको यासह विविध शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. यासोबतच रुग्णांना नाश्ता, चहा आणि दुपार व रात्रीचे जेवणही विनामूल्य दिले जाणार आहे. विशेष म्हणजे एंजिओग्राफीवर 100 टक्के सूट देण्यात येणार आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. नीरज मुरके, डॉ. सुनील हातकर, डॉ. सचिन हीरे, डॉ. रूपाली क्षीरसागर यांचा समावेश असून, ते मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.
डॉ. नीरज मुरके यांचे मत :
“आमचे उद्दिष्ट आहे की या आरोग्य मेळाव्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा. केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्डची प्रत दाखवून रुग्ण मोफत तपासणी आणि उपचार घेऊ शकतात.”
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास आयोजन :
मेळाव्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजनही करण्यात येणार आहे. मेडिकल कॉलेजमधील 150 एमबीबीएस विद्यार्थ्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रुग्णांची काळजी घेतील.
म्हणून, जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला आरोग्यविषयक समस्या असेल, तर ही सुवर्णसंधी गमावू नका. 17 ते 19 मार्चदरम्यान डॉ. गोडे मेडिकल कॉलेजला नक्की भेट द्या आणि या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्या